

नाशिक : शहरात वाहने चालविताना वेगावर मर्यादा राखण्याचे सातत्याने आवाहन केले जात असतानाही अनियंत्रित वाहने चालवून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये तिघे गंभीररित्या जखमी झाले असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. जखमींमध्ये दोघे पादचारी, तर एक मोपेडस्वार युवती आहे. नांदूर नाका येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील बुलेटने दिलेल्या धडकेत ८७ वयोवृद्ध जखमी झाल्याची घटना घडली. (Series of accidents due to reckless speed in city )