
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेच्या विवरणासह उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचीही माहिती द्यावी लागते. त्यानुसार नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुधाकर बडगुजर, अपक्ष डॉ. डी. एल. कराड आणि करण गायकर यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बहुतांशी उमेदवारांविरोधात राजकीय स्वरूपाचे जमावबंदी व शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. (Serious crimes against dr Karad and Badgujar Revealed from information in affidavit filed for assembly elections )