सेट परीक्षेला दीड हजार परीक्षार्थ्यांची दांडी

सेट परीक्षेला दीड हजार परीक्षार्थ्यांची दांडी
Published on: 
NSK26H33520 नाशिक : व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील सेट परीक्षा केंद्राबाहेर उभे असलेले विद्यार्थी तसेच प्रवेश न मिळाल्याने केंद्राबाहेर थांबलेले विद्यार्थी. ---------- नाशिकमध्ये दीड हजार परीक्षार्थ्यांची दांडी सेट परिक्षा ः नाईक केंद्रावर विलंबामुळे काहींना प्रवेश नाकारल्याने संताप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२५ ः महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा रविवारी (ता.२५) पार पडली. जिल्ह्यातून ६ हजार २४७ परीक्षार्थी हजर तर १ हजार ५९० परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. खराब रस्‍त्‍यांमुळे पोहोचण्यास दोन ते पाच मिनिटांचा विलंब झाल्‍यामुळे केंद्रात प्रवेश नाकारल्‍याचा आरोप गंगापूर रोडवरील व्‍ही. एन. नाईक महाविद्यालयाच्‍या केंद्रावरील काही परीक्षार्थ्यांनी केला. दरम्‍यान या उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. राज्यातील १७ तसेच गोव्यातील १ अशा एकूण १८ शहरांमध्ये सेट परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत एकूण ३२ विषयांचा समावेश होता. यापूर्वी विविध तांत्रिक कारणांमुळे परीक्षेच्‍या तारखेत तीन वेळा बदल करण्यात आला होता. रविवारी सकाळी दहा ते अकरादरम्‍यान पेपर क्रमांक एक तर साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत पेपर क्रमांक दोन पार पडला. शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरवस्थेमुळे केंद्रावर पोहोचण्यास अवघे दोन ते पाच मिनिटांचा विलंब झाल्‍याने थेट केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्‍याची तक्रार काही परीक्षार्थ्यांनी केली. गंगापूर रोडवरील व्‍ही. एन. नाईक महाविद्यालय परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. --- इन्‍फोः पेपर दोनच्‍या प्रश्‍नांची कसोटी विशेष विषयावर आधारित पेपर क्रमांक दोनमधील प्रश्‍न सोडविताना कसोटी लागल्‍याची प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी दिल्‍या. वेळेत प्रश्‍न सोडविणे आव्‍हानात्‍मक ठरले. पहिल्‍या पेपरमध्ये तार्कीकतेवर व गणित विषयक प्रश्‍न सोडविताना कस लागल्‍याचेही उमेदवारांनी नमूद केले. ------- इन्‍फोः नाशिकमधील परीक्षेचा तपशील- - परीक्षेस नोंदणीकृत परीक्षार्थी- ७,८३७ - परीक्षेस उपस्‍थित परीक्षार्थी- ६,२४७ - परीक्षेस गैरहजर परीक्षार्थी- १,५९० - उपस्‍थितीचे प्रमाण- ७९.७१ -------- कोटः H33525 शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरवस्थेमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटांचा विलंब झाला होता. केंद्र कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु प्रवेश नाकारल्‍याने माझ्यासह इतर अनेक परीक्षार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. - रोमा परदेशी, परीक्षार्थी. --- कोटः H33524 प्रवेशपत्रावर रिपोर्टींग टाईमबद्दल कुठलाही उल्‍लेख नव्‍हता. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असल्‍याने, निर्धारित वेळेपूर्वी प्रवेश देणे शक्‍य होते. परंतु काही मिनिटांच्‍या विलंबामुळे प्रवेश नाकारण्यात आला. याचा फटका आम्‍हाला बसला आहे. - वैभव भालेराव, परीक्षार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com