
वणी : या देवी सर्व भुतेषु। क्षुद्यारुपेण संस्थिता.. नमः तस्यै नमः तस्यैः। नमः तस्यैः नमो नमः.. च्या पुरोहितांच्या मंत्रघोषात व आदिमाया सप्तशृंगीच्या जयघोषात आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग गडावर आदिमायेच्या दरबारात शाकंबरी नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित शांकभरी महायागास आज पासून भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आदिमायेच्या शाकंबरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत श्री भगवती मंदिरात त्रीदिनात्मक शाकंभरी महायागास हजारो भाविकांच्या उपस्थित आज उत्साहात प्रारंभ झाला आहे.