Nashik News : गटविकास अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस; टोकडे भ्रष्टाचार प्रकरणी दीर्घ कालावधी उलटूनही अहवालास विलंब

Nashik : गुन्हे दाखल करण्याबाबत आवश्यक अहवाल सादर न करणे मालेगावचे गटविकास अधिकारी यांना भोवले आहे.
Notice
Notice esakal

Nashik News : टोकडे (ता. मालेगाव) भ्रष्टाचार प्रकरणी दीर्घ कालावधी उलटूनही गुन्हे दाखल करण्याबाबत आवश्यक अहवाल सादर न करणे मालेगावचे गटविकास अधिकारी यांना भोवले आहे. वेळेत अहवाल सादर न केल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटिशीत म्हटले आहे. (Show cause notice to Group Development Officer in Toke corruption case delay in report )

विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी केलेल्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही होत नसून केलेल्या चौकशीचा अहवाल अतिशय मोघम स्वरूपाचा कार्यालयाकडे सादर केला आहे. सदर तक्रारीवर संबंधितावर जबाबदारी निश्चित करून त्यांचेवर ग्रामपंचायतीत केलेल्या अपहारावरील रक्कम व त्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत अर्जात नमूद आहे. यावर मागील चार वर्षांपासून कार्यवाही होत नसून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावर देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (latest marathi news)

Notice
Nashik News : इगतपुरीत 24 तासांत 100 मिमिपेक्षा जास्त पाऊस! धुक्यामुळे वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्ग मंदावला

ज्या कामांबाबत आणि योजनांबाबत कायमचा अपहार व संशयित अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची पडताळणी करून झालेला अपहार व अपहाराची रक्कम आणि त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी व पदाधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर केलेल्या अपहाराबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे, त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, त्याप्रमाणे कारवाई होणेकरिता टोकडे ग्रामपंचायत येथे भगतसिंग सभामंडप, सार्वजनिक महिला शौचालय (सन २०१७) चौक सुशोभीकरण, संगणक कक्ष ही व इतर कामे जागेवर झालेली नाही.

अर्जानुसार, ज्या कामांबाबत आणि योजनांबाबत कायमचा अपहार किंवा संशयित अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची पडताळणी करून झालेल्या अपहाराची रक्कम दर्शविणारा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे, अपहार करणारे संबंधित जबाबदार कर्मचारी/अधिकारी व पदाधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून त्यांचे संपूर्ण नावे व पत्यासह अहवाल सादर करण्याबाबत कळवूनदेखील त्यावर कार्यवाही केलेली नाही. तरी, कोणतीही कार्यवाही न केल्याने नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये, असे गटविकास अधिकारी यांना बजाविण्यात आलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.

Notice
Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com