

Shravan 2024 : ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेत श्री कपालेश्वर संस्थानतर्फे भाविकांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती रविवारी (ता. २८) विश्वस्त मंडळ पदाधिकाऱ्यांनी दिली. देशातील नंदी नसलेले एकमेव शिवालय अशी ओळख असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची वर्षभर गर्दी असते. संस्थानात गेल्यावर्षी नवीन कार्यकारी मंडळाची स्थापना झाली. (Shree Kapaleshwar Temple ready for holy Shravan month )
यंदाच्या श्रावणमासाची सुरवात व शेवट सोमवारीच होत आहे, हा योग सत्तर वर्षांनी आला आहे. या काळातील दोन्ही प्रदोष शनिवारी आल्याने शनिप्रदोषचा दुर्मिळ योग आला आहे. देवस्थानतर्फे श्रावणात खासगी सुरक्षारक्षकांबरोबरच सूर्या, गरूडझेप करिअर अकादमीच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन करणात येणार आहे. पाचही श्रावणी सोमवारी दुपारी चार वाजता पालखी सोहळ्याचे, तर प्रदोषनिमित्त दुसऱ्या व चौथ्या शनिवारीही दुपारी चार वाजता पालखी सोहळा रंगेल. संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
भाविकांना रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, उपाध्यक्ष सुनील पटेल, सचिव ॲड. प्रशांत जाधव, विश्वस्त श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे, व्यवस्थापक सुनील शिनगान उपस्थित होते. श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची मोठ्या प्रमाणावर झीज झालेली आहे. त्यामुळे शिवलिंगावर वज्रलेप लावण्यात येणार आहे. यासाठी विश्वस्तांसह मंदिरातील पुजारी, गुरव यांच्यात मतैक्य झाले असून श्रावण महिन्यानंतर हे काम पूर्ण केले जाणार आहे. (latest marathi news)
राबविण्यात येणारे उपक्रम
भाविकांच्या सुविधेसाठी भक्तनिवास
मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद
गर्भागृहाचा जिर्णोद्धार
भाविकांना एलईडी स्क्रीनद्वारे लाइव्ह दर्शन
देवस्थानला ‘क’ वर्ग मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
झीज झालेल्या गोमुखाचा जिर्णोद्धार
अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर
संस्थानच्या विविध मिळकतींचा शोध घेणे
उत्पन्नात दुप्पट वाढ
श्री कपालेश्वर संस्थानात गतवर्षी नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. नवीन विश्वस्त मंडळाच्या स्थापनेनंतर म्हणजे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात देवस्थानचे उत्पन्न ४० लाख ६८ हजार तीनशे साठ रुपये जमा झाले. मागील वर्षी म्हणजे १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात हे उत्पन्न केवळ १९ लाख ८२ हजार ८०४ रुपये होते, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.