नाशिक: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व उच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार सिद्धार्थनगर व कबीरनगर झोपडपट्टी हटविण्याचा अहवाल नगररचना विभागाने दिला असला तरी याच विषयावर दोन भूमिका मांडल्या आहेत. दोन्ही झोपडपट्ट्यांत जवळपास आठशे झोपड्या असून, हटविल्यास अनेक नागरिक विस्थापित होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याशिवाय जलवाहिनी ब्लास्ट झाल्यास जीवितहानीदेखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.