Nashik City Transport : बत्ती गुलमुळे सिग्नल यंत्रणा बंद! शहरात वाहतुक कोंडी

Nashik News : शहरातील बहुतांशी भागात शनिवारी (ता.१८) वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद होती. यामुळे रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
Traffic jam in the city
Traffic jam in the cityesakal

Nashik News : शहरातील बहुतांशी भागात शनिवारी (ता.१८) वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद होती. यामुळे रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा कोलमडून पडली. तर, लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात असल्याने पुरेशा मनुष्यबळाअभावी वाहतूक सुरळीत करताना उपस्थित वाहतूक पोलिस अंमलदारांची चांगलीच दमछाक झाली. (Signal system down in most parts of city on Saturday due to power outage)

दरम्यान, निवडणूक साहित्य घेऊन जाण्यासाठी वाहने त्र्यंबकरोडवरील बांधकाम भवन येथे येणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर शनिवारी (ता.१८) सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. याचप्रमाणे, उपनगरीय परिसरातील रस्त्यावरही वाहतूक कोंडीची समस्या होती.

द्वारका सिग्नल याठिकाणी तर सिग्नल यंत्रणा कोलमडून पडल्याने चौबाजूंनी वाहनांची रहदारी आल्याने मोठी कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी असलेल्या वाहतूक पोलिस अंमलदारांची चांगलीच दमछाक झाली. अशीच स्थिती मुंबई नाका सर्कलवर होती. भाभानगर, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल, सर्व्हिस रोडवर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

तर, त्र्यंबक रोडवरील त्र्यंबक नाका, मायको सर्कललाही वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले. लोकसभा निवडणुकीसाठी वाहतूक शाखेच्या अंमलदारांना बंदोबस्त दिलेला आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात वाहतूक शाखेला शहरातील वाहतुकीचे नियोजन करावे लागते आहे. परिणामी, शनिवारी अपुऱ्या मनुष्यबळात वाहतूक अंमलदारांवर अतिरिक्त ताण आला. (latest marathi news)

Traffic jam in the city
Nashik News : सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा! उपायुक्तांकडून 10 दिवसांची मुदतवाढ

वाहतूक मार्गात बदल

रविवारी (ता.१९) सकाळी त्र्यंबक रोडवरील बांधकाम भवन येथून निवडणूक साहित्य वाटप होणार आहे तर, सोमवारी (ता.२०) दिवसभर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान साहित्य जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे.

त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने रविवारी (ता.१९) सकाळी ७ ते दुपारी २ आणि सोमवारी (ता.२०) सायंकाळी ६ ते प्रक्रिया संपेपर्यंत मायको सर्कल ते बाफना ज्वेलर्स आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते जुने सीटीबी सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहील.

तर, वाहनचालकांनी सीटीसेंटर मॉलकडून मायको सर्कलकडे येणारी वाहने संभाजी चौकातून यामाहा शोरुमकडून त्र्यंबक रोडने मार्गस्थ होतील. तसेच जुना सीटीबी सिग्नलकडून हनुमान मंदिराकडे जाणारी वाहने मायको सर्कलमार्गे मार्गस्थ होतील, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले आहे.

Traffic jam in the city
Nashik Lok Sabha Election : राजकीय पदाधिकार्यांची पोलिसांकडून ‘कोंडी’; गुन्हेगारांसह राजकीय पदाधिकार्यांना तडीपारीच्या नोटीसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com