
नाशिक : विधानसभा निवडणुकीतील शहर-जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तपोवनातील मैदानात पार पडली. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय राहिल्याने लक्ष वेधून घेतले होते. तर, सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने तपोवन परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. (Significant crowd of women at Prime Minister Modi meeting at Tapovan )