Shri Ganga Godavari Temple Nashik history
esakal
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त बारा वर्षांनंतर रामतीर्थाच्या उत्तरेस असलेले ऐतिहासिक श्री गंगा-गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. शनिवारी (ता.३१) धर्मध्वज सोहळ्याच्या मुहूर्तावर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात (Shri Ganga Godavari Temple Nashik history) आले. सिंहस्थ पर्वाच्या कालावधीत देशभरातून येणाऱ्या भाविकांना या मंदिरातील प्राचीन मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे.