नाशिक: राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते कामाच्या २ हजार २७० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करताना त्यात क्लब टेंडरींग (एकत्रित निविदा) झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यासंदर्भात चौकशी सुरु असतानाच आता महापालिकेच्या वतीने प्राधान्यक्रमासह रस्त्यांची अ, ब, क अशी तीन टप्प्यात वर्गवारी करून जवळपास दीड हजार कोटींच्या कामांची एकच निविदा काढून एकाच कंपनीला काम देण्याचा प्रकार होत असून स्थानिक कंत्राटदारांना ‘सिंहस्थ’ कामातून बाहेरचा रस्ता दाखविण्याचे प्रकार समोर येत आहे.