पान-३ मेन
-------------चांगले डिझाईन करणे
३६-४
संपूर्ण गोदाघाट दोन दिवस ‘नो व्हेईकल झोन’
------------
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण : धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण, गोदा आरतीमुळे वाहतूक बदल
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२५ : सिंहस्थ महाकुंभमेळा पार्श्वभूमीवर धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण सोहळा आणि गोदा आरतीसाठी नाशिक शहर पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या ३० आणि ३१ तारखेला होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रपतींसह साधू- महंत, व्हीव्हीआयपी, राजकीय नेते तसेच भाविक उपस्थित राहणार असल्याने रामतीर्थ व गोदाघाट परिसर ‘नो व्हेईकल झोन’ राहणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गातील बदलांसंदर्भात विशेष अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केले आहेत.
....
धर्मध्वज मिरवणूक मार्ग व प्रवेश बंदी (३० ऑक्टोबर)
- शुक्रवारी ३० तारखेला सकाळी सहापासून मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध.
- तपोवन मैदान येथून निघणारी धर्मध्वज मिरवणूक आठवण लॉन्स, तपोवन क्रॉसिंग, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, अहिल्याबाई होळकर पुलामार्गे रामतीर्थापर्यंत येईल.
- प्रवेश बंद मार्ग : मिरवणुकीतील वाहने वगळून अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट, मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका आणि दिंडोरी नाका ते मालेगाव स्टँड हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील.
........
पर्यायी मार्ग
- दिंडोरी नाका - पेठ नाका- मखमलाबाद नाका- गोदा पार्क - गजभिये पेट्रोल पंप - गंगापूर नाका.
- सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोक स्तंभ - जुना गंगापूर नाका - फडोळ चौक - बाजार समिती सिग्नल - अमृतधाम चौक.
- पेठनाका - कृषी उत्पन्न सिग्नल - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक, मिरची चौक
- दिंडोरी नाका - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक - मिरची चौक
- द्वारकाकडून बळी मंदिराकडे जाणाऱ्यांसाठी : उड्डाणपुलाचा वापर करावा.
....................
ध्वजारोहण व गोदा आरतीनिमित्त वाहतुकीत बदल (३१ ऑक्टोबर)
- ३१ तारखेला सकाळी सहा ते मध्यरात्री बारापर्यंत रामतीर्थाकडे जाणारे मुख्य रस्ते नागरिक व वाहनांसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत.
- प्रवेश बंद मार्ग :
- अशोकस्तंभ - रविवार कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - दिंडोरी नाका.
- मखमलाबाद नाका - मालेगाव स्टॅण्ड - रामतीर्थ - कपालेश्वर मंदिर - सरदार चौक - गौरी पटांगण
- रामतीर्थ - खांदवे सभागृह - मालवीय चौक - पंचवटी कारंजा
- शनी चौकाकडून रामतीर्थाकडे जाणारा मार्ग
- रामसेतू पुलावरून वाहतूक बंद
......
पर्यायी मार्ग
- दिंडोरी नाका - पेठनाका सिग्नल - मखमलाबाद नाका - गोदापार्क - चोपडा लॉन्स - गंगापूर नाका
- सीबीएस - मेहेर - अशोकस्तंभ - जुना गंगापूर नाका - ड्रिम कॅसल - फडोळ चौक - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक
- पेठनाका - कृषी उत्पन्न सिग्नल - तारवालानगर, - अमृतधाम चौक - मिरची चौक
- दिंडोरी नाका - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक - मिरची चौक
.........
पार्किंगची ठिकाणे व पायी जाण्याचा मार्ग
- पार्किंगचे ठिकाण ... पार्किंगकडे जाण्याचा मार्ग ........ कार्यक्रम स्थळाकडे पायी जाण्याचा मार्ग
१. संभाजी महाराज गार्डन... गंगापूर रोड- गुरांचा दवाखाना-सिद्धेश्वर मंदिर .... अहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त मंदिर- गांधी तलाव.
२. अशोकस्तंभ- रविवार कारंजा .... गंगापूर रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा .... सराफ बाजार, भांडीबाजार, निळकंठेश्वर घाट, गांधी तलाव.
३. शिवाजी महाराज स्टेडिअम .... अशोकस्तंभ, मेहेर सिग्नलमार्गे व सीबीएस, मेहेर सिग्नलमार्गे .... रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी पॉईंट, नेहरु चौक, रोकडोबा मैदान
४. रुंगठा स्कूल .... गंगापूर रोड, अशोकस्तंभ ..... सिद्धेश्वर मंदिर, संभाजी महाराज गार्डन, होळकर पुलाखालून गांधी तलाव
५. बी.डी. भालेकर मैदान .... मोडक सिग्नल, भालेकर मैदान व खडकाळी सिग्नल, भालेकर मैदान ..... शालिमार, रेडक्रॉस सिगनल, धुमाळ टी पॉईंट, नेहरू चौक, रोकडोबा मैदान
६. शिंदे मळा ... तपोवन क्रॉसिंग, कन्नमवार पुलाखालून अमरधाम रोड, शिंदेमळा..... गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, जुने भाजी पटांगण.
७. शिंदे मळा...महामार्गाने ट्रॅक्टर हाऊस, नानावली पोलीस चौकी, अमरधाम पुलाखालून शिंदे मळा ..... गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, जुने भाजी पटांगण
८. गौरी पटांगण... गणेशवाडी देवी चौक, फुलबाजार, गौरी पटांगण... जुने भाजी पटांगण
-----------------
चौकट
नो- पार्किंग झोन
-दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा, रविवार कारंजा ते रेड क्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नल ते रेड क्रॉस सिग्नल आणि भाविकांच्या पायी चालण्याच्या मार्गांवर वाहने पार्क करण्यास सक्त मनाई आहे.
------