Nashik Unseasonal Rain : सिन्नर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

Nashik News : या पावसाने सिन्नर शहरातील नागरिकांची तसेच शेतकरी राजाची कांदे झाकण्यासाठी धावपळ उडाली, तर दुसरीकडे पूर्वमशागतीसाठी हा पाऊस पंधरा दिवसाने पडला असता तर शेतकरी राजाला फायदेशीर होता पण...
Unseasonal Rain in sinnar
Unseasonal Rain in sinnaresakal

सिन्नर : सिन्नर शहरासह तालुका परिसरात अक्षय तृतीयाच्या दिवशी (दि. 10) दुपारी 3 वाजल्यानंतर वातावरण अचानक ढगाळ झाले. साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरात दहा ते पंधरा मिनिटे गारांसह वादळी पाऊस झाला. दुपारी 3 ते 4:30 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सिन्नर शहरातील नागरिकांची तसेच शेतकरी राजाची कांदे झाकण्यासाठी धावपळ उडाली, तर दुसरीकडे पूर्वमशागतीसाठी हा पाऊस पंधरा दिवसाने पडला असता तर शेतकरी राजाला फायदेशीर होता पण काही ठिकाणी पाऊस जास्त तर काही ठिकाणी पाऊस थोड्याफार प्रमाणात पडल्याने शेतकरी राजाची चिंता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (Nashik Sinnar city taluka unseasonal rain)

सिन्नर शहरासह तालुक्यात सगळीकडे पाऊस असल्याचे असल्याचे चित्र दिसून आले. परिसरात शुक्रवारी सकाळी अतिउष्ण वातावरण होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले, तर 3 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

या पावसात चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला, तर बघता बघता हलक्या पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकीकडे उष्णता ने अंगाची लाही होत होती, त्यातच पाण्याचा तुटवडा जाणवत होता, अशातच अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी राजा सुखावला असल्याचे दिसून आले.

कांदे व इतर पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात ठेवलेल्या कांदा पिक व इतर पिके जाखण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली. (Latest Marathi News)

Unseasonal Rain in sinnar
Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

सिन्नर शहर तालुक्यात विजेच्या कडकडाट अन वादळीवाऱ्यासह पाऊस

सिन्नर शहर तालुक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. ग्रामीण भागात वादळी वारा व विजेच्या कडकडाट असल्याने. पावसाचा जोर कमी प्रमाणात होता, तर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातही वीज खंडित करण्यात आल्या होता. तसेच शेतात पाणी साचलेले होते तर रस्त्यावरही पाणी वाहताना दिसत होते.

पश्चिम पट्ट्यात पावसाची जोरदार हजेरी

गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विंचूर दळवी परिसरात अवकाळी पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावल्याने तेथील मका पिकांना व आधी पिकांना जीवदान मिळाल्याचे सांगण्यात आले. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात रस्त्यावर पाणी वाहत होते.

Unseasonal Rain in sinnar
Nashik Unseasonal Rain News : अवकाळी, वादळी पावसाने मोसम खोऱ्यामध्ये मोठी हानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com