नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार असून, त्यासाठी महापालिकेऐवजी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. यानंतर नाशिक महापालिकेसह प्राधिकरणामध्ये वर्णी लावण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे आता लवकरच मुदत संपुष्टात येणाऱ्या नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीकडून संपूर्ण कंपनीच सिंहस्थासाठी प्रस्तावित प्राधिकरणामध्ये वर्ग करण्याची मागणी केली आहे.