

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत या सप्ताहात तेलाच्या दरात दोन रुपये लिटरमागे तेजी आली असून, नवीन तूरडाळ व नवीन तांदळाचे दर उतरले आहेत. जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात आवक वाढल्यानंतर तूरडाळीचे दर अजून कमी होतील. गेल्या सप्ताहात बाजारपेठेत ग्राहकांचा अभाव असल्याने तेलाच्या दरात पाच ते सात रुपये लिटरमागे घसरण झाली होती. मात्र या सप्ताहात दोन रुपयांनी सोया तेलाच्या दरात वाढ झाली असून, सूर्यफूल व इतर तेलाचे दर मात्र स्थिर आहेत.