
नाशिक : जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत हा सप्ताह तुलनेने स्थिर राहिला. सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली, मात्र बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने सोयाबीन तेलाच्या भावात पाच ते सात रुपये लिटर मागे घसरण झाली. बाकी इतर वस्तूंचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या थंडीचा हंगाम जोरात सुरू असल्याने लाडूच्या वस्तूंना व सुका मेव्यास मागणी चांगली असून बाजारात लाडूसाठी लागणारी खारीक १५० रुपये किलोपासून ५०० रुपयांपर्यंत, खोबरे २४० पासून ३०० रुपये किलो असे गुणवत्तेनुसार उपलब्ध आहे.