.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मालेगाव : महापालिका हद्दीत गणेशाच्या विसर्जनासाठी चारही कुंडांची स्वच्छता, रंगरंगोटी व इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून बांधलेला सोयगाव गणेश कुंड कार्यान्वित होत असून येत्या दोन ते तीन दिवसात काम पूर्ण होईल. शहरातील हा सर्वात मोठा गणेशकुंड आहे. शहरात संगमेश्वरातील महादेव घाटावर पुरातन गणेशकुंड आहे. या कुंडावरच श्रींचे विसर्जन केले जात होते. (Soygaon Ganesh Kund for first time Ganesh Kund of Municipal Corporation for immersion in final stage )