Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेत फूट! राजकारण तापले

Nashik News : पुनर्नियुक्तीवर काम करीत असलेले ग्रामसेवक संजय बाविस्कर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने तडकाफडकी कार्यमुक्त केल्यावर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेंतर्गत राजकारण तापले आहे.
Nashik ZP
Nashik ZP esakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात आठ वर्षांपासून पुनर्नियुक्तीवर काम करीत असलेले ग्रामसेवक संजय बाविस्कर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने तडकाफडकी कार्यमुक्त केल्यावर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेंतर्गत राजकारण तापले आहे. या कार्यमुक्तीवरून ग्रामसेवक युनियनमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले. (Split in gram sevak organization of district)

युनियनमधील एका गटाने महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेशी संलग्न असल्याचे पत्र त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना दिले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र मित्तल यांना दिले आहे.

गत आठवड्यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविले जात नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर, ग्रामसेवक संघटनांच्या शिष्टमंडळाने मित्तल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ग्रामपंचायत विभागाकडील संघटनांच्या प्रश्नाबाबत चर्चा करीत, बाविस्कर यांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी केल्याची चर्चा होती.

त्यामुळे या भेटीनंतर मित्तल यांनी बाविस्कर यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी बाविस्कर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढत मूळ पदस्थापना असलेल्या चांदवड पंचायत समितीत हजर राहण्याचे आदेश दिले. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik News : पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशापासून वंचित? राज्य शासनाकडून अद्यापही कापड उपलब्धतेची प्रतीक्षा

या कार्यमुक्तीचे पडसाद ग्रामसेवकांमध्ये उमटू लागले आहेत. ग्रामसेवक युनियन संघटनेने बाविस्कर यांची तक्रार केल्यावर युनियनमधील एका गटाने बाहेर पडून तांत्रिक ग्रामसेवक संघटनेत प्रवेश केला आहे. त्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिल्यावर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत विभागप्रमुखांची भेट घेतली.

भेटीत संघटनेचे रवींद्र ठाकरे, विनोद आहिरे, माया मोढे आदींनी ग्रामसेवक बाविस्कर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. तर, त्यांच्यावरील कार्यवाही मागे घेण्याची मागणी केली. असे असताना दुसरीकडे ग्रामसेवक युनियनने मित्तल यांना पत्र देत, असहकार आंदोलनाची हाक दिली आहे.

ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत विभागप्रमुखांची भूमिका उदासीन व नकारात्मक असल्याने ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हे प्रलंबित प्रश्न सोडविले जात नसल्याने ७ जूनपासून असहकार आंदोलन करणार असल्याचे युनियनने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यावर, संघटनेचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, सरचिटणीस संजय गिरी यांच्या सह्या आहेत.

Nashik ZP
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com