
नाशिक : श्रीलंकेत उत्पादित होणारा कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागविण्यासाठी श्रीलंका सरकारने आयातीवरील शुल्कात २० टक्के कपात केली आहे. भारतीय निर्यातदारांना आता केवळ १० टक्के निर्यात शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीलंकेत कांद्याला मागणीमुळे जिल्ह्यातील कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल.