Nashik News : प्रवाशांचा एसटीला भरभरून प्रतिसाद! सुट्ट्या आणि श्रावणामुळे नाशिक विभागाची विक्रमी उत्पन्न नोंद
Women passengers drive higher bus occupancy : राखीपौर्णिमेची जोडून आलेली सुट्टी आणि श्रावण महिन्यामुळे नाशिकच्या बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाने एका दिवसात विक्रमी १.५३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.
नाशिक: राखी पौणिमेला आलेली जोडून सुटी, तसेच श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला जाणारे भाविकांमुळे बस प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली होती. सोमवारी (ता. ११) नाशिक विभागाने तब्बल १ कोटी ५३ लाख रुपये इतके विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे.