
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता इच्छुक उमेदवारांनी आठवड्याचा पहिला दिवस सोमवारचा (ता. २८) मुहूर्त निवडला. परंतु त्यामुळे ऐनदिवाळीच्या खरेदीमुळे गजबजलेल्या बाजारपेठा इच्छुकांच्या रॅलीने वाहतूक कोंडीत सापडल्या. तर, जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. मात्र या कडेकोट बंदोबस्तामुळे वाहतुकीची कोंडी होऊन बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना पोलीसांच्या दबंगगिरीला सामोरे जावे लागले. (stalemate with rally of aspirants leading to gridlock in main market in city )