
Nashik News : राणेनगर बोगदा येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढे सरसावले आहे. इंदिरानगर बोगद्याच्या धर्तीवर या ठिकाणीदेखील लोखंडी गर्डर (आय बीम) बसविण्याच्या कामाला गुरुवारी (ता. २९) सुरूवात करण्यात आली. यामुळे उंच वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद होणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने हे काम सुरू करण्यात आले. (Start of girder work in Rane Nagar tunnel to help smooth traffic )