
नाशिक : संशोधनाच्या साहाय्याने उद्योजकतेची वाट धरत नाशिकच्या युवा उद्योजकांनी यशस्वी स्टार्टअपची उभारणी केली आहे. नाशिकच्या मातीत साकारलेल्या स्टार्टअपचा आज जगभरात डंका आहे. सद्यःस्थितीत नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या सातशेहून अधिक असून, दिवसागणिक वाढ होत आहे. गुंतवणूक आकर्षित करण्यातही हे स्टार्टअप आघाडीवर आहेत. शासनाच्या स्तरावर स्टार्टअपला प्रोत्साहनासाठी विविध शासकीय योजना आहेत.