Nashik News : विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम; राधाकृष्ण गमे निवृत्त

Nashik News : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी शासनाने राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
Dr. Praveen Gedam
Dr. Praveen Gedamesakal

Nashik News : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी शासनाने राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. २०१४ ते २०१६ या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत डॉ. गेडाम महापालिकेचे आयुक्त राहिले आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr. Praveen Gedam appointed as Divisional Commissioner of Nashik)

नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. देशभरातील भाविक त्यानिमित्त नाशिकमध्ये येत असल्याने कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे सर्वांचे लक्ष असते. त्यादृष्टीने प्रशासन आत्तापासूनच तयारीला लागले असून, २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असलेले डॉ. गेडाम यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. (latest marathi news)

Dr. Praveen Gedam
Nashik Onion News : महाराष्ट्रच्या कांद्याला ‘ठेंगा’! बंगळुरूच्या कांद्याची एक्स्पोर्ट ड्यूटी माफ

वर्षभरापासून त्यांच्याकडे कृषी आयुक्तपदाचा कार्यभार होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिक जिल्ह्यात विशेषत: निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते.

सिंहस्थाचे सूक्ष्म नियोजन

डॉ. गेडाम महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा कामाचे नियोजन केले होते. कामातील नीटनेटकेपणा व गुणवत्तापूर्ण कामे ही त्यांच्या कामाची वैशिष्ट त्यामुळे सिंहस्थाचे काम योग्य पद्धतीने झाले. साधू- महंतांना विश्‍वासात घेऊन त्यांनी यशस्वीरीत्या सिंहस्थ कुंभमेळा पार पाडला.

Dr. Praveen Gedam
Nashik News : सिडकोवासीय समस्यांनी त्रस्त, लोकप्रतिनिधी मस्त! नागरिकांमध्ये वाली नसल्याची भावना; प्रश्‍न सुटण्याची आस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com