Nashik News : रामगिरी महाराजांवर कारवाईसाठी मनमाड पोलिस ठाण्यात ठिय्या! धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाने आंदोलन मागे

Nashik News : शुक्रवारी (ता. १६) रामगिरी महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
A cleric guiding the Muslim brothers on Friday.
A cleric guiding the Muslim brothers on Friday.esakal
Updated on: 

मनमाड : श्रीक्षेत्र गोदावरी धाम सद्‌गुरू गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी (ता. १५) महामार्गावर रास्ता रोको केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा या घटनेचे पडसाद शहरात उमटले.

शुक्रवारी (ता. १६) रामगिरी महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुस्लिम बांधवांशी पोलिस उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या आश्‍वासनानंतर तसेच धर्मगुरू, मौलानांनी मार्गदर्शन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Stay at Manmad Police Station for action against Ramgiri Maharaj)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com