Nashik NMC
Nashik NMC Newsesakal

Nashik NMC News : पावसाळापूर्व कामाचा अहवाल सादर करा! आयुक्तांच्या सूचना

Nashik News : महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन पुरामध्ये सापडणाऱ्या नागरिकांना शाळा व महापालिकेच्या सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Published on

Nashik News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पूर्वतयारीला सुरवात झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन पुरामध्ये सापडणाऱ्या नागरिकांना शाळा व महापालिकेच्या सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक नाल्यांची तातडीने सफाई करून पावसाळापूर्व कामाचा अहवाल सादर करून त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. (municipal Commissioner Instructions)

महापालिका आयुक्त करंजकर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या वेळी विविध सूचना दिल्या. नाशिक शहरात जवळपास ६५ नैसर्गिक आले आहेत. या नाल्यांमधील पाणी प्रवाहित राहण्यासाठी स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा असल्याने घनकचरा विभागाने स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते.

यातून जनजीवन विस्कळित होते. वाहतूक कोंडीदेखील होत असल्याने असे प्रकार टाळण्यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज व चेंबरची स्वच्छता करावी, बुजलेली छिद्रे मोकळी करावी अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम विभागाला देण्यात आल्या. पुराच्या पाण्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरते.

त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच नदीकाठच्या भागात पुराच्या पाण्यामुळे तेथील नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर होण्यासाठी महापालिकेच्या शाळा व समाजमंदिरांमध्ये स्थळे निश्चित करण्याचे सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. (latest marathi news)

Nashik NMC
Nashik News : मोदींच्या सभेत झिरवाळ यांचे मानापमान नाट्य

गोदावरी नंदिनी नदीत अनेक ठिकाणी छोटे-मोठे पूल आहेत या पुलांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून विशेष म्हणजे प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. हा कचरा हटविण्याचे सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी पथदीपांचा वीज पुरवठा सुरळीत राहील या संदर्भात दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

नाल्यावरील अतिक्रमण धोकादायक

शहरातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अनेक ठिकाणी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम झाले आहे. मात्र महापालिकेचा नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या.

Nashik NMC
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com