Nashik Success Story : 'लहरों से डरकर नौका पार नहीं होती...' सैन्यदलात अनफिट ठरलेला विकास बनला कर सहाय्यक!

Nashik News : लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले.
Vikas Shewale
Vikas Shewaleesakal
Updated on

खामखेडा : बारावीपर्यंत शिक्षण व वैद्यकीय कारणामुळे सैन्यदलातून अनफिट ठरत घरी यावे लागल्याने येथील विकास शेवाळे याने पदवी पूर्ण करीत कोरोनाकाळात घरीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले.

त्याची नुकतीच पालघर येथे कर सहाय्यक म्हणून नेमणूक झाली. परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते, असेच विकासने दाखवून दिले आहे. (Nashik Success Story Vikas become tax assistant marathi news)

‘लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती’ हे ब्रीद विकासच्या बाबतीत अगदी खरे ठरणारे असेच आहे. खामखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी संजय वामन शेवाळे त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांना विकास व अमोल ही दोन मुले. विकास हा त्यांचा थोरला मुलगा. विकास बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि लगेचच २०१४ मध्ये जव्हार येथे झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत सैन्यात भरला गेला.  (latest marathi news)

Vikas Shewale
Nashik Success Story : अपयशाचा सामना करत अखेर यशाला गवसणी; चारवेळा ‘MPSC’त अपयशी यतीन झाला उपजिल्‍हाधिकारी

मराठा लाईट इन्फ्रटी बेळगाव येथे सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात नऊ महिने खडतर प्रशिक्षणानंतर त्याची भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून पहिली निवड झाली. मात्र, पळण्याचा सराव करत असताना पाय फॅक्चर झाला व सैन्य दलातील नोकरी कायमस्वरूपी सोडावी लागली. २०१९ मध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तो कर सहाय्यकपदी रुजू झाला.

Vikas Shewale
Success Story : भटक्या समाजातील सौरभ पवार लष्करात लेफ्टनंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hard Work Pays Off: Farmer’s Son Selected as Indian Air Force Flying Officer
Success story of Gaurav Londhe
Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Marathi News Esakal
www.esakal.com