Nashik Vote Counting : मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवा : सुधाकर बडगुजर

Vote Counting : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने ईव्हीएमबाबत संशय उपस्थित करत त्यात फेरफार होण्याची भिती व्यक्त केली आहे.
District Chief Sudhakar Badgujar interacting with the counting center representatives at the Shiv Sena office. Other officers nearby.
District Chief Sudhakar Badgujar interacting with the counting center representatives at the Shiv Sena office. Other officers nearby.esakal

Nashik Vote Counting : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने ईव्हीएमबाबत संशय उपस्थित करत त्यात फेरफार होण्याची भिती व्यक्त केली आहे. मतमोजणी प्रतिनिधींनी डोळ्यात तेल घालून प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली. ( statement of Keep an eye on vote counting process )

मतमोजणी केंद्र प्रतिनिधींची रविवारी (ता. २) शालिमार येथील शिवसेना कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी शहरप्रमुख विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, मनोहर मेढे, उप जिल्हाप्रमुख जगनराव आगळे, निवृती लांबे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, संजय चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण, विकास गिते, मसुद जिलानी, नीलेश साळुंखे उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत. त्यांच्या मतमोजणीसाठी ही बैठक घेण्यात आली. इव्हीएम मतमोजणी पूर्वी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट युनिटचा नंबर ‘१७ सी’ नुसार आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. आयोगाने दिलेल्या वेळेनुसार ऑपरेट झाले आहे की नाही याची खात्री करावी. (latest marathi news)

District Chief Sudhakar Badgujar interacting with the counting center representatives at the Shiv Sena office. Other officers nearby.
Vote Counting : मतमोजणीसाठी पोलिसांकडून आढावा सुरू; 4 जूनला मतमोजणी

प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मतदान मोजताना त्याची पडताळणी करावी. तसेच कन्ट्रोल युनिट व बॅलेट युनिट बॅटरी चार्ज किती टक्के आहे. बदललेली असेल तर फूल चार्ज असेल मतदान करते वेळी बॅटरी मशीनमध्ये असेल तर ती २० ते २५ टक्के बॅटरी चार्ज असेल याची पण पडताळणी करावी, असेही बडगुजर पुढे म्हणाले.

शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. थोडी जरी शंका आली तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ती बाब आणून द्यावी,असेही शिंदे यांनी सांगितले. सचिन बांडे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲड. गुळवेंचे स्वागत

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मविप्र संस्थेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार वसंत गिते, अनंत जगताप यांनी गुळवे यांचे स्वागत केले.

District Chief Sudhakar Badgujar interacting with the counting center representatives at the Shiv Sena office. Other officers nearby.
Nashik Vote Count : स्ट्राँग रुम भोवतीचा परिसर ‘सील’; लोकसभा निवडणूकीची उद्या मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com