वेगवेगळ्या घटनांमध्ये
तिघांच्या आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पहिल्या घटनेत अमोलसिंग रमेशसिंग परदेशी (४१, रा. जानकी हाईटस्, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांनी रविवारी (ता. १) पहाटे साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. भाऊ सागर परदेशी यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, हवालदार हारपडे हे तपास करीत आहेत. दुसरी घटना पेठ रोड परिसरातील घडली. आकाश दीपक काथवटे (३३, रा. अक्षर निसर्ग अपार्टमेंट) यांनी रविवारी (ता. १) सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. श्रीकांत भोई यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तर तिसरी घटना नेहरू चौकातील जुन्यात वाड्यात घडली. हर्षद मनोज साळवेकर (५६, रा. कानडे मारुती लेन, जुने नाशिक) यांनी रविवारी (ता. १) पहाटे वेलदे वाड्यात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. पुतण्या हिमांशू बर्वे यास सकाळी साडेआठच्या सुमारास सदर घटना समजली आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद झाली आहे. हवालदार गांगुर्डे तपास करीत आहे.