
नाशिक : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू होत असलेला यंदाचा सुलाफेस्ट तंत्रस्नेही असणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या बँड्समध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला. यावर नमूद क्यूआर कोडच्या सहाय्याने महोत्सवात खाद्यपदार्थ, पेय खरेदी करणे शक्य होणार आहे. येत्या १ व २ फेब्रुवारीला सुला विनियार्ड्स प्रांगणात होत असलेल्या या संगीत महोत्सवात डिजिटल पेमेंटला चालना दिली जाईल.