Nashik Summer Heat : आधी पारा चाळिशी पार! नंतर 4 अंशांपर्यंत घसरण; ढगाळ वातावरण, वाऱ्याचा परिणाम

Summer Heat : एकीकडे यंदाच्‍या उन्‍हाळी हंगामात कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा स्‍तर ओलांडला.
Summer Heat
Summer Heat

Nashik Summer Heat : गेल्‍या आठवड्याभरात नाशिककरांनी वातावरणातील बदल अनुभवले. एकीकडे यंदाच्‍या उन्‍हाळी हंगामात कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा स्‍तर ओलांडला. तर दुसरीकडे आठवड्याभरात कमाल तापमानात चार अंशांपर्यंत घसरण नोंदविली गेली आहे. रविवारी (ता.२१) दिवसभर ढगाळ वातावरण व वारा असल्‍याने उकाड्याचे प्रमाण घटले होते. मात्र आगामी आठवडा उष्णतेचा राहणार असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याचा आहे. (nashik summer heat Over last week citizen have experienced change in atmosphere )

हल्‍लाददायी हवामानासाठी जागतिक स्‍तरावर ओळख असलेल्‍या नाशिकमध्ये यंदा मात्र उन्‍हाळ्याच्‍या तीव्र झळा बसत आहेत. मार्चमध्ये प्रखर सूर्यकिरणांचा सामना केल्‍यानंतर आता एप्रिल महिन्‍यात कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. लाही-लाही करणाऱ्या उष्णतेमुळे नाशिककर घामाघूम झाल्‍याचे आठवड्याभरात बघायला मिळाले.

पारा वाढीमुळे शहराच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्‍या काही दिवसांपासून दुपारी शुकशुकाट बघायला मिळतो. आठवड्याला सुरवात झाल्‍यावर सलग चार दिवस नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले. त्‍यानंतर मात्र गेल्‍या तीन दिवसांत सातत्‍याने कमाल तापमानात घसरण झाली. रविवारी पावसाची दाट शक्‍यता असताना सायंकाळी उशिरापर्यंत मात्र पाऊस बरसला नव्‍हता.

ढगाळ वातावरण राहणार कायम

राज्‍यात विविध ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाचा इशारा हवामान खात्‍याने दिला आहे. शनिवार (ता.२७) पर्यंत काही वेळा विजांच्या कडकडाटासह तर काहीवेळा तुरळक स्वरूपात राज्‍यात अवकाळी पाऊस पडू शकतो. त्‍यामुळे नाशिकमध्येही ढगाळ वातावरण कायम राहाण्याची शक्‍यता आहे. तर काही वेळा अवकाळी पावसाचीही शक्‍यता कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्‍यता आहे.(latest marathi news)

Summer Heat
Nashik Summer Heat : दशकात नाशिक यंदा सर्वाधिक उष्ण; एप्रिलमध्येच सरासरी ओलांडली

नाशिकचे आठवड्यातील तापमान

तारिख कमाल किमान

१५ एप्रिल ४०.४ २३.३

१६ एप्रिल ४०.७ २४.५

१७ एप्रिल ४०.६ २३.२

१८ एप्रिल ४०.७ २३.५

१९ एप्रिल ३९.४ २४.३

२० एप्रिल ३७.७ २४.३

२१ एप्रिल ३६.१ २२.९

Summer Heat
Nashik Summer Heat : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल; महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com