Nashik Summer Heat : मालेगावात तापमान वाढू लागले! रविवारी पारा गेला 42 अंशावर

Summer Heat : शहर व परिसरात उन्हाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
Temperature
Temperature esakal
Updated on

Nashik Summer Heat : शहर व परिसरात उन्हाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसामुळे चार दिवस पारा खाली आला होता. दोन दिवसापासून तापमान पुन्हा ४२ अंशावर गेल्याने जिवाची काहिली होणारे ऊन पडत आहे. यामुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत सोमवारी (ता.२०) लोकसभा निवडणुकीचे मतदान किती टक्के होते याबाबत उत्सुकता आहे. ( temperature starts rising in Malegaon on Sunday temperature reached 42 degrees )

येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान वाढत गेले आहे. जवळपास दीड महिने पारा ४२ ते ४४ अंशादरम्यान राहिला आहे. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा मिळाला होता. १२ व १३ मे या दोन दिवसात पारा ४० अंशाच्या खाली आला होता. १४ मे पासून तापमान पुन्हा ४० अंशावर गेले आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे १६ मेस पारा पुन्हा ३९.२ अंशापर्यंत खाली आला होता. दोन दिवसापासून कडक ऊन पडत आहे. तापमान ४१ अंशावर गेल्याने सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत. कडक उन्हामुळे दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत दळणवळण मंदावले आहे. (latest marathi news)

Temperature
Nashik Summer Heat Stroke : उष्माघाताने महिलेचा बळी! नांदूर नाका परिसरातील घटना

मतदानाचा टक्का वाढावा

लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावरच उन्हाचा तडाखा वाढल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांना धडकी भरली आहे. निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी महिन्यापासून विविध उपक्रम राबविले. यातून जनजागृती करण्यात आली. असे असले तरी कडक ऊन अडसर ठरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन सर्वच घटकांपुढे आहे.

मालेगावातील तापमान

तारीख - तापमान

१५ मे - ४०

१६ मे - ३९.२

१७ मे - ४०.२

१८ मे - ४१.२

१९ मे - ४२

Temperature
Nashik Summer Heat : सर्वाधिक उष्माघाताचे 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यात; रुग्णसंख्येत वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com