Nashik Summer Vacation: नाशिककर निघाले उन्हाळी पर्यटनाला! उत्तराखंड, काश्मीरचे बुकिंग फुल्ल; अयोध्यावारीचीही उत्सुकता

Nashik News : उन्हाळ्याच्या सुट्या लागताच नाशिकमधील पर्यटकांनी राज्यासह देशभरात प्रवास सुरु केला आहे.
Summer Vacation India
Summer Vacation Indiaesakal

Nashik Summer Vacation : शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अशात उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घरोघरी, मित्रमंडळींमध्ये प्लॅन ठरू लागले आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अन् अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून गारवा मिळविण्यासाठी नाशिककरांकडून कश्मीर, उत्तराखंड, शिमला मनालीसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आले आहे. (Nashik Summer Vacation excitement for tourism Uttarakhand Kashmir bookings full )

उन्हाळ्याच्या सुट्या लागताच नाशिकमधील पर्यटकांनी राज्यासह देशभरात प्रवास सुरु केला आहे. यामध्ये पर्यटकांनी थंड हवेच्या ठिकांणांना पसंती दिली आहे. राज्यातील महाबळेश्वर, माथेरानच्या दिशेने नाशिककरांची पावले वळू लागली आहेत तर देशात काश्मीर, शिमला मनालीकडे पर्यटकांचा कल आहे. निसर्गाचा आनंद अन् रिव्हर राफ्टींग, बंजी जंपिंग सारख्या साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी नाशिकमधील हौशी पर्यटकांनी उत्तराखंडची निवड केली आहे. यासह नेपाळ, काठमांडूसाठी देखील मोठ्या प्रमाणावर बुकींग केले आहे.

रेल्वेच्या प्रवासाला पसंती

लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटला, की नागरिकांची पहिली पसंती रेल्वे प्रवासाला दिली जाते. खिशाला परवडणाऱ्या दरात आरामदायी प्रवासासाठी पर्यटक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देत आहे. कमी दिवसात आपली ट्रिप पूर्ण करणारे पर्यटक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. (latest marathi news)

Summer Vacation India
Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचंय? तर ही आहेत चांगली ठिकाणं

अयोध्यावारीला चांगला प्रतिसाद

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाची नागरिकांना उत्सुकता आहे. प्रेक्षणीय पर्यटनस्थळांसह अयोध्येसाठी देखील नागरिकांनी बुकिंग केले आहे.

"वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणांना पसंती देत आहेत. नाशिकमधील पर्यटकांचा कल उत्तराखंड, काश्मीर, शिमला मनाली असा असून या ठिकाणांचे सर्व बुकिंग फुल्ल झाले आहे."- राम गोपाल चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी.

"या उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह जम्मू काश्मीर जाण्याचा प्लॅन केला आहे. काश्मीरमध्ये जायचे म्हटल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांमध्ये मोठा उत्साह आहे."- प्रशांत वामन

"दरवर्षी सुट्यांमध्ये कुठेतरी लांब जाण्याचा विचार यायचा त्यामुळे यंदा उत्तराखंडला जाणार आहोत. उत्तराखंडमध्ये जाऊन रिव्हर राफ्टींग करण्यासाठी उत्सुक आहे."- अॅड. पायल वर्पे

"कुटुंबासह शिमला मनाली तसेच नेपाळ काठमांडू येथे पर्यटनासाठी जाणार आहे. कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो."- अॅड. मंगल हांडे

"आम्ही वैष्णोदेवी, काश्मीर येथे प्रवास केला. तेथील नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे. सुटीतील पर्यटन वर्षभरासाठी कामात ऊर्जा देणारे आहे."- अॅड. संगीता संगमनेरकर.

Summer Vacation India
Summer Vacation Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत बजेट-फ्रेंडली ट्रीप प्लॅन करायचीय? मग, 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोअर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com