Nashik Water Scarcity : मार्च एन्डलाच सूर्य तळपला; बळीराजा करपला! माणसांबरोबर शेतीसह पाणीटंचाईचे मळभ आले दाटून

Water Crisis : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून बिरुद मिरवणारा सर्वार्थाने एव्हरग्रीन तालुका म्हणून निफाड तालुक्याचा नावलौकिक आहे पण...
Vinta river which has never flowed this year.
Vinta river which has never flowed this year.esakal

निफाड : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून बिरुद मिरवणारा सर्वार्थाने एव्हरग्रीन तालुका म्हणून निफाड तालुक्याचा नावलौकिक आहे. मात्र, यंदा पाऊस न बसल्याने नदी, नाले, बंधारे कोरडेठाक पडायला सुरवात झाली आहे. माणसांबरोबर शेतीसह पाणीटंचाईचे मळभ दाटून आले आहे. वाड्यावस्त्यांवर पाण्याचा ठणठणाट सुरू झाला आहे. यंदा पाणीटंचाईची धग तालुक्याच्या सीमावर्ती गावांत निश्चितच जाणवणार आहे. (Nashik increase heat March water scarcity crisis at niphad taluka marathi news)

निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा, बाणगांगा, पाराशरी व गोई या प्रमुख नद्यांबरोबरच नांदूरमध्यमेश्वर धरण आणि गोदावरी व पालखेड कालव्यामुळे तालुक्याच्या बहुतेक गावांत योजनांद्वारे पाणी पोचले आहे. पेयजल योजनेमुळे बऱ्याच भागात पाणीटंचाईची धग कमी झाली आहे.

मात्र, काही वर्षांत पर्जन्यमान घटले. मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामाची पाण्याअभावी धुळधाण झाली. यंदा पाऊस म्हणावा तसा न बरसल्यामुळे गोदावरी, कादवावगळता एकही नदी प्रवाहीत झाली नाही. हंगामाचेही मातेरे झाले. अनेकानी कांदा, द्राक्ष व ऊस पिकांना ब्रेक दिला.

विकतचे पाणी घेऊन, काटकसरीने पाण्याचा वापर करत द्राक्ष हंगाम कसाबसा घेतला. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांत झालेल्या पावसामुळे कालव्यांना आवर्तने मिळत आहेत. मात्र, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न डोके वर काढणार, हे निश्चित आहे. (latest marathi news)

Vinta river which has never flowed this year.
Nashik Water Crisis : तलाव कोरडा पडल्याने येवल्याचा पाणीपुरवठा ठप्प! पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात मका व उसाला चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. उन्हाचा तडाका आणि पाणीटंचाईचा भडक्यापासून वाचण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

"निफाड तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवत नसली, तरी अगामी काळात पाणीप्रश्नी प्रशासन सतर्क आहे. गरज भासल्यास टंचाईग्रस्त गावांसाठी तातडीने विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जाईल."-महेश पाटील, गटविकास अधिकारी, निफाड

"निफाडच्या उत्तरेकडील उगाव, शिवडी, सोनेवाडी, खेडे, वनसगाव, खडकमाळेगाव, खानगाव भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे द्राक्ष बागांना वाचविण्यासाठी चिपाडाचे गाठी खरेदी करून मल्चिंग करावी लागत आहे. मार्च एण्डपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. तपमान ३५ अंशापार आहे."-रामनाथ शिंदे, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ

Vinta river which has never flowed this year.
Nashik Water Supply News : पिंपळगावचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार : सरपंच भास्करराव बनकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com