
नाशिक : गंगापूर रोडवर विरुद्ध दिशेने कार चालवून समोरून येणाऱ्या मोपेडसह एका कारला भरदिवसा धडक देत मोपेडवरील ज्येष्ठ दांपत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाल्याप्रकरणी संशयित स्मिता विजय रासकर (५०, रा. रोहित हाईटस्, जेहान सर्कल, गंगापूर रोड) यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच खटल्याचे गांभीर्य पाहता जलदगतीने चालविण्याचे आदेशही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.