Nashik Bribe Crime : लाचखोर ASI गोसावीचे निलंबन; पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांची कारवाई

Bribe Crime : लाचखोरी प्रकरणातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर गोसावी यास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
bribe
bribesakal

Nashik Bribe Crime : लाचखोरी प्रकरणातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर गोसावी यास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात कारवाई करताना आदेश जारी केले आहेत. संशयित लाचखोर असलेल्‍या शंकर गोसावी यांची पोलिस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ उरलेला होता. (nashik Suspension of bribe taking ASI Gosavi marathi news)

पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत असताना अँन्टी ट्रॅफिक सेलमध्ये कार्यरत असताना त्यांना बेपत्ता झालेल्‍या अनेक मुलींचा शोध लावण्यात यश आले होते. ही जबाबदारी सांभाळताना त्‍यांनी जोड व्‍यवसायाला सुरवात केली होती. पुढे विशेष शाखेत नियुक्‍ती असताना कुठलेही अधिकार नसूनही कॉलेज रोडवरील कॅफे चालकाला धमकावले होते.

तसेच दर महिन्‍याला हप्ता बांधत वसुली केल्‍याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने संशयित गोसावीच्या घरी धडक देत झडती घेतली होती. मात्र तपासणी अंती पथकाला मालमत्ता किंवा ऐवज हाती लागला नव्‍हता. दरम्‍यान या प्रकरणात कारवाई करताना पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी गोसावीचे निलंबन आदेश जारी केले आहेत. (latest marathi news)

bribe
Nashik Bribe Crime : 5 लाखांची लाच मागणाऱ्या सहकाराची कारागृहात रवानगी

तक्रार दाखल केल्‍यानंतर फुटले बिंग

कॉलेजरोड परिसरातील कॅफे रेस्टॉरंटमध्ये युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी चालकाकडून टेबलभोवती आडोसा केलेला होता. ही गोष्ट हेरून संशयित गोसावीने गेल्या सहा महिन्यांपूर्वी कॅफेचालकाला धमकावताना कारवाई न करण्याच्‍या बदल्‍यात दरमहा हप्ता देण्यास दबाव आणला.

त्‍यानुसार तीन हजार रुपये महिन्‍याला हप्ता सुरु करून घेतला. मात्र कॅफेचालकाकडून यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्‍यानंतर पथकाने बुधवारी (ता.६) सापळा रचत गोसावीला लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली होती. यानंतर खातेअंतर्गत कारवाई केली आहे.

bribe
Nashik Bribe Crime : दरमहा पैसे घेणारा पोलिस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com