NDCC Bank: कर्जदारांविरोधात गुन्हे दाखल आदेशाला स्थगिती! जिल्हा बॅंकेचे नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

Latest Marathi News : जिल्हा बँकेच्या खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल), जेऊळके शाखेत सोसायटीचे सभासदांना मंजूर झालेले पीक कर्ज संचालक मंडळातील संचालकांनी स्वतःचे व नातेवाइकांचे नावाने वाटप करून घेतले.
NDCC Bank
NDCC Bankesakal

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नियमबाह्य कर्जवाटप केलेल्या दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी), खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल) या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांविरोधात पोलिस तक्रार करण्यास दिंडोरी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच याबाबतचे स्थगिती पत्र वणी पोलिस स्टेशनला देखील देण्यात आले आहे. (Nashik NDCC Bank marathi News)

जिल्हा बँकेच्या खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल), जेऊळके शाखेत सोसायटीचे सभासदांना मंजूर झालेले पीक कर्ज संचालक मंडळातील संचालकांनी स्वतःचे व नातेवाइकांचे नावाने वाटप करून घेतले. सोसायटीचे इतर सभासदांना कर्ज रक्कम मिळालीच नाही. बँकेचे सनदी लेखापाल यांनी सन २०२१-२२ चे लेखा परिक्षणात हे नियमबाह्य कर्ज वाटप झाल्याचे उघड झाले होते.

यावर बॅंकेने स्वतंत्र लेखापरिक्षण करून घेतले. यात, संबंधित तिन्ही सोसायटी संचालक दोषी आढळले. त्यानंतर या प्रकरणी वणी पोलिसांत गत वर्षापूर्वीच तक्रार अर्ज सादर झाला. मात्र, ही फसवणूक क्लिष्ट स्वरूपाची असल्याने पोलिसांकडून अहवाल मागविला. बॅंकेने प्राथमिक तपासानुसार सविस्तर अहवाल वणी पोलिसांनी सादर केला होता.

परंतु, अधीक्षक कार्यालयातून अद्याप आदेश न मिळाल्याने वणी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नव्हता. या प्रकरणी बँकेमार्फत देखील लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र, गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर, बॅंक प्रशासन, जिल्हा उपनिबंधक, सहकार निबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हा दाखल व्हावा, यासाठी दिंडोरी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संबंधित सोसायटी कर्जदारांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयात कर्जदारांनी आव्हान दिले. यात १५ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती दिली. या स्थगितीने बॅंकेच्या कारवाईला चपराक बसली आहे. (Latest Marathi News)

NDCC Bank
Godavari Mahaarti: महाआरत्यांनी गोदाकाठ दुमदुमला! गोदावरी महाआरतीस प्रारंभ

कर्ज भरणा केलेला आहे

गणपतबाबा पाटील व दत्तात्रय पाटील त्यांचे कुटुंबीय शोभना गणपत पाटील व विद्याताई दत्तात्रय पाटील या सर्व सभासदांनी त्यांचे सर्व सोसायटीने दिलेले कर्जाचा पूर्ण भरणा केलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सभासद सदस्यांनीही सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार कर्जाच्या ५ टक्के रकमेचा भरणा केलेला असून उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत दिलेली आहे.

जिल्हा बॅंकेने प्रत्यक्षात कर्जपुरवठा केलेला नसताना जादाचे व्याजदर लावून कर्जाचा डोंगर उभा करून वसुली करत आहे. या प्रकरणात बॅंकेचे काही अधिका-यांचा चुकीचे काम समोर येणार आहे. त्यांना वाचविण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतबाबा पाटील यांनी सांगितले.

NDCC Bank
Nashik Political News : विविध संवर्ग परिक्षा अन् निकालास ‘लोकसभा’ आचारसहिंतेचा फटका?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com