Nashik News : अजंगला 8 वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू; गावात तणावाचे वातावरण

Nashik : (ता.मालेगाव) अजंग येथील आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिचा मृतदेह गावालगत असलेल्या मोसम नदीपात्रातील आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Rastraroko movement on the highway
Rastraroko movement on the highwayesakal

वडेल : (ता.मालेगाव) अजंग येथील आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिचा मृतदेह गावालगत असलेल्या मोसम नदीपात्रातील आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बालिकेवर लैगिंग अत्याचार करुन तिचा खून केला असल्याचा संशय ग्रामस्थांनी करीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. ( Suspicious death of 8 year old girl in ajung village )

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंजग येथील आठ वर्षीय बालिका मंगळवारी (दि.१४) रोजी मध्यरात्री घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा इतरत्र शोध घेवूनही ती मिळून आली नाही. दरम्यान, बुधवारी (दि.१५) रोजी गावालगत असलेल्या मोसम नदीपात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत तिचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली.

Rastraroko movement on the highway
Nashik News : पश्चिम पट्ट्याला चक्रीवादळाचा तडाखा! सुरगाणा तालुक्यात अनेक घरे उद्ध्वस्त

बालिकेवर लैगिंक अत्याचार करुन तिचा खून केल्याचा आरोप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत अजुनही पोलिसांनी बालिकेवर लैगिंग अत्याचार झाले की नाही, तिचा खून झाला की काय? याबाबत कुठलाही दुजारो दिलेला नाही. दरम्यान या प्रकरणी काही संशयित आरोपी योगेश शिवदास पटाईत(३२) ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

याप्रकरणी अधिक दोषींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केल्याने गावात तणावाचा वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Rastraroko movement on the highway
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com