
नाशिक : स्वर्ण पॅलेसला ७२ लाखांचा चुना
धुळे : येथील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्समध्ये दोन विश्वासू कामगारांनी मालकाला सोने, चांदीचा अपहार करत सुमारे ७२ लाखांना चुना लावला. या प्रकरणी मालक प्रकाश जोरावरमल चौधरी (रा. नित्यानंद नगर, नटराज थिएटरमागे) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात आज रात्री साडेनऊला संशयित कामगारांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
प्रकाश चौधरी व सरदारमल चौधरी ही भावंडे स्वर्ण पॅलेस ज्वेलर्सचे कामकाज पाहतात. त्यांना एक ते नऊ एप्रिलदरम्यान सोनेचादींच्या स्टॉकमध्ये तफावत असल्याचे तपासणीवेळी जाणवले. स्टॉकची देखरेख ठेवण्यासाठी चौधरी यांनी शांतीराम हमीराम कलबी (रा. मंडार, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) याची नेमणूक केली होती.
त्याने मालकाचा विश्वास संपादन केला होता. मात्र, कलबी व त्याचा साथीदार किशोर नटवरलाल कोळी (रा. पिथापुरा, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) यांनी विश्वासाचा गैरफायदा घेत सरासरी ५१ लाखांचे सोन्याचे दागिने, २१ लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले. त्यांनी दागदागिन्यांचा अपहार व फसवणूक केल्याने मालक प्रकाश चौधरी यांनी या दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणी दुकानातील एक कामगार हितेश दिनेशकुमार जोशी याने १३ एप्रिलला आत्महत्या केली असून त्या दिवसापासून संशयित शांतिलाल कलबी फरार झालेला आहे. त्यापूर्वी त्याने साथीदार कामगार किशोर कोळी याच्या मदतीने स्वर्ण पॅलेस ज्वेलर्समधून ७१ लाख ६४ हजार ४०० रुपयांचे दागिने काढून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Web Title: Nashik Swvrn Palace Jewelers Worker Thift And Fraud Owner 72 Lakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..