
सटाणा : ताहाराबाद (ता.बागलाण) वन परीक्षेत्रातील वनमजूर श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आज प्रजासत्ताक दिनी ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात साळुंखे ६० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.