Accident
sakal
नाशिक: तवली फाटा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत दहावीचा विद्यार्थी ठार झाला. रस्त्यालगत उसाच्या रसाच्या गाड्यावर तो वडिलांना मदत करत होता. रविवारी (ता. २२) दुपारी बापाच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने बापाचा झालेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संशयित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.