’पवित्र’च्या २७४ शिक्षकांना नियुक्ती

’पवित्र’च्या २७४ शिक्षकांना नियुक्ती
Published on: 
‘पवित्र’च्या २७४ शिक्षकांना नियुक्ती प्राथमिक शिक्षण विभागातर्फे कार्यवाही, १५ दिवसांत हजर होण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या यादीत जिल्ह्याला २८३ शिक्षकांची यादी प्राप्त झाली आहे. त्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी समुपदेशनाद्वारे २७४ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप व उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया पार पडली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया चालू आहे. नाशिक जिल्हा परिषदेने एकूण ९९९ रिक्त जागांची माहिती शासनाला कळविली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७१७ पैकी ६८० शिक्षकांना नियुक्तीपत्र मिळाले आहे. यात पदवीधर आणि उपशिक्षकांचा समावेश होता. रिक्त राहिलेल्या जागांनुसार दुसऱ्या यादीत २८३ शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांचे कागदपत्र पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी २७४ शिक्षकांना बुधवारी समुपदेशनाने नियुक्ती मिळाली असून १५ दिवसांच्या आत त्यांना शाळेत हजर होण्याची सक्ती केली आहे. पवित्रच्या माध्यमातून आतापर्यंत ९६३ शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून उर्वरित ३६ जागांसाठी पुढील टप्प्यात प्रक्रिया राबविण्यात येईल. या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील रिक्त जागांचे प्रमाण जवळपास शून्यावर पोहोचले आहे. आदिवासी भागातील (पेसा) शाळांमध्ये या भरतीप्रक्रियेपूर्वीच शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे जिल्ह्यात आदिवासी व बिगर आदिवासी या दोन्ही भागातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com