‘नाशिक ते नासा’तून शिक्षकांना अमेरिका दौऱ्याची संधी

‘नाशिक ते नासा’तून शिक्षकांना अमेरिका दौऱ्याची संधी
Published on: 
जि. प.च्या तिघा शिक्षकांना अमेरिकेच्या दौऱ्याची संधी नाशिक ते नासा उपक्रम ः विद्यार्थ्यांसोबत समन्वयासाठी निवड सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ : जिल्हा परिषदेच्या ‘नाशिक ते नासा’ या अभिनव उपक्रमांतर्गत यंदा इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील ‘नासा’ येथे शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात येणार आहे. या शैक्षणिक दौऱ्यात शिक्षकांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शिक्षकांमधून तीन शिक्षकांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून ‘नाशिक ते नासा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, यासाठी शिक्षकांचाही या दौऱ्यात समावेश करण्यात येणार आहे. निवड होणाऱ्या तीन शिक्षकांपैकी किमान एक महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असावा आणि परदेशातील या शैक्षणिक दौऱ्यासाठी स्वेच्छेने सहभागी होण्याची तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असावी. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने जिल्हा परिषद नाशिकचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली. ... या शिक्षकांना मिळेल संधी - शिक्षकाला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक - शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम, कमाल वय ४५ वर्षे - संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता, वेळेचे व आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता - अडचणीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य असणे अपेक्षित - संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणत्याही स्वरूपाची विभागीय किंवा खाते चौकशी नसावी - कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसावा - अर्ज करण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.