Nashik Bribe Crime: नाशिक तहसिलदार बहिरम ACBच्या जाळ्यात; 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक

Bribe case
Bribe case esakal

Nashik Bribe Crime : तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना, नाशिक तालुक्याचे तहसिलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली.

सदरची लाच स्वीकारताना तहसिलदार नरेशकुमार बहिरम (४४, रा. मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली आहे. (Nashik Tehsildar Bahiram arrested ACB accepting bribe of 15 lakhs Crime

तकारदाराच्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथे शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये मुरुमाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यासंदर्भात नियमानुसार पाचपट दंड व स्वामित्वधन जागा भाडे मिळून त्यांना १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

यासंदर्भात जमीन मालक यांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिक तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्यासाठी लाचखोर तहसिलदार बहिरम याने जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते.

परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदारास त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याने ते निरीक्षण वेळी उपस्थित होते. त्यावेळी लाचखोर बहिरम याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bribe case
Jalgaon Bribe Crime : ‘महसूल दिनी’च लिपिक अडकला लाचेच्या जाळ्यात

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामावेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार पथकाने आज (ता. ५) सायंकाळी कर्मयोगी नगर परिसरात सापळा रचला असता, लाचखोर बहिरम याने १५ लाख रुपयांच्या लाचेची रककम स्वीकारली.

त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना रंगहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. तसेच, बहिरम याच्या फ्लॅटमध्ये पथकाकडून रात्री उशिरापर्यंत झडतीसत्र सुरू होते.

सदरची कारवाई विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी केली.

Bribe case
Bribe News : वैधमापनशास्त्र विभागातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com