कमाल तापमान ३.२ अंशने घटले, किमान ३.३ अंशांनी वाढले

कमाल तापमान ३.२ अंशने घटले, किमान ३.३ अंशांनी वाढले
Published on: 
कमाल तापमान ३.२ अंशाने घटले पुढील काही दिवस संमिश्र वातावरण कायम राहणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : ऑक्‍टोबर हिटचा तडाखा सहन केल्‍यानंतर आता मिश्र स्वरूपाचे वातावरण अनुभवायला मिळते आहे. गेल्‍या आठवड्याभरात कमाल तापमानामध्ये ३.२ अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे. तर याउलट किमान तापमानात ३.३ अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली गेली आहे. देशपातळीवरील वातावरणीय बदलांमुळे हा परिणाम झाल्‍याचा अंदाज वर्तविला आहे. गेल्‍या रविवारी (ता. २५) नाशिकचे किमान तापमान १८. ३ अंश सेल्‍सीयस, तर कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. तर रविवारी (ता. १) नाशिकचे किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. ऑक्‍टोबर हिटच्‍या चटक्‍यामुळे कमाल तापमान थेट ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. परंतु वादळी स्‍थिती व भौगोलिक बदलांमुळे कमाल तापमानात घसरण नोंदविली आहे. दुसरीकडे किमान तापमान किरकोळ प्रमाणात वाढले आहे. पुढील काही दिवस संमिश्र स्वरूपात वातावरण कायम राहणार असल्‍याचाही अंदाज आहे. ---------- नाशिकचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) तारीख किमान कमाल २५ ऑक्‍टोबर १८.३ ३४.१ २६ ऑक्‍टोबर १६.२ ३४ २७ ऑक्‍टोबर १६.२ ३३.७ २८ ऑक्‍टोबर १४.३ ३३ २९ ऑक्‍टोबर १८.९ ३३.३ ३० ऑक्‍टोबर २० ३२.५ ३१ ऑक्‍टोबर २१.६ ३०.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.