
चांदोरी : समोर निळंशार पाणी... सभोवताली पक्ष्यांचा किलबिलाट आणि काठालगत असलेली छोटी-छोटी टेंट हाउस, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. बंदिस्त रूममध्ये राहण्यापेक्षा तरुणाई टेंट कॅम्पिंगला पसंती देत आहे. गोदावरीच्या पक्षी अभयारण्य पर्यटनात नदीकाठावरील कॅम्पिंगची क्रेझ वाढू लागली आहे. याचा फायदा पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांना होत आहे.