
नाशिक : जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींचा लवकरच बिगूल वाजणार असून त्याठिकाणी थेट सरपंच निवडण्याचे आरक्षणही निश्चित झाले आहे. ‘पेसा’क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळता उर्वरित १०६ ग्राम पंचायतींमध्ये अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीच्या १३, ओबीसींसाठी २९ जागा राखीव असतील. तर ५६ सरपंचाच्या जागा या खुल्या प्रवर्गात असतील. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेरीस संपुष्टात येत आहेत.