
नाशिक : शहरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये चाकू, तलवारींपेक्षा धारदार कोयत्यांचा वापर वाढला आहे. केवळ मारहाणीसाठीच कोयत्याचा वापर होतो आहे, असेही नाही. तर, खून आणि प्राणघातक हल्ल्यातही कोयत्याचा वापर होत असल्याने पोलिसांसमोर कोयताधारी गुन्हेगारांचे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत खून आणि प्राणघातक हल्ल्यातील किमान निम्म्यापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.