नाशिक: पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली असून, ‘एनआयए’ने त्यांच्या कामगिरीबद्दल युनिट एकला प्रशस्तिपत्रही दिले आहे. मात्र, हा संशयित दहशतवादी सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरी करत होता आणि शहरात मुक्तपणे वास्तव्य करत होता, याची कुठलीही खबर नाशिक पोलिस किंवा त्यांच्या गोपनीय शाखेला नव्हती, हे अधिक धक्कादायक आहे. यामुळे शहराच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.