Nashik News : शालेय पुस्तकांचा पुनर्वापर करूया...! ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह: रंगूबाई जुन्नरे शाळेचा स्तुत्य उपक्रम

Nashik News : घरातील भावंडे एकमेकांची पुस्तक वापरतात त्याचप्रमाणे, शालेय विद्यार्थी त्यांच्या मित्रमैत्रिणींचे पुस्तकांचा संच दरवर्षी वापरतात.
text book exchange drive
text book exchange driveesakal

Nashik News : परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तकांचा संच शाळेत जमा करायचा, त्या मोबदल्यात पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा संच शाळेतून घेऊन जायचा आणि यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागत नाही. ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम शाळेने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेला स्तुत्य असा उपक्रम आहे. घरातील भावंडे एकमेकांची पुस्तक वापरतात त्याचप्रमाणे, शालेय विद्यार्थी त्यांच्या मित्रमैत्रिणींचे पुस्तकांचा संच दरवर्षी वापरतात. (Nashik Text Book Exchange Drive news)

जूनमध्ये पालकांना दरवर्षी मुलांच्या नवीन पुस्तक खरेदीचा खर्च असतो. शिवाय वर्षभर पुस्तक वापरल्यानंतर दुसऱ्या वर्षी काही लगेच जुनी होत नाही. मग तीच पुस्तक इतर विद्यार्थ्यांना उपयोगी पडली तर, पुनर्वापरातून पर्यावरणाचे संवर्धन होते, झाडे वाचतात, परिणामी कागदावर होणारा खर्च वाचतो आणि पालकांचा आर्थिक भार कमी होतो.

वास्तविक आजची पिढी ‘डिमांडिंग’ आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट नवीन हवी असते. बऱ्याचदा जुने वापरायचे म्हणून नाक मुरडली जातात पण, पूर्ण शाळेत उपक्रम राबविल्यामुळे जुनं ते सोनं समजून विद्यार्थी एकमेकांची पुस्तक आनंदाने वापरतात. इयत्तेनुसार प्रत्येक वर्षी पुस्तकांची किंमत वाढत जाते.

आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च साधारण अकराशे ते तेराशे रुपयांपर्यंत येतो. शाळेत एकूण १४४० विद्यार्थी आहेत. त्यानुसार सर्व पालकांचा लाखो रुपयांचा खर्च या उपक्रमामुळे वाचतो. त्याचबरोबर आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी परवडणारी नसते तर, काही पालक स्वतःहून नवीन पुस्तकांचा संच शाळेत भेट म्हणून आणून देतात.  (latest marathi news)

text book exchange drive
Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयाचे मनपाच्या जागेवर अतिक्रमण! परवानगी न घेताच तलाठी कार्यालयाचे बांधकाम

सर्व पारदर्शी व्यवहार असल्याने शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी-पालक पुस्तकांचा संच शाळेत आणून देतात आणि पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमांचा संच घेऊन जातात. त्याची नोंदणी केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना संच निवडण्याची मुभा दिली जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक आनंदी आहेत. शेवटी स्टेशनरी व्यावसायिकांची पुस्तकांची विक्री कमी झाल्याने ते शाळेकडे विचारणा करतात.

"इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रकाशक, दुकानांशी टायअप करतात आणि दरवर्षी पालकांना नवीन पुस्तक विकत घ्यायला लावतात. आम्ही पालकांना पुस्तकांवर खर्च करायला सांगत नाही तर, पुस्तकांची अदलाबदल करून ते सर्वच विद्यार्थ्यांच्या उपयोगात आणली जातात."

-प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, नाएसो

"पुस्तकांमुळे विद्यार्थी त्यांच्या सीनियर मित्रांची चांगली मैत्री होते, त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आम्हाला फरक जाणवला. आम्ही पालकांना जुन्या वह्यांची कोरे पान फाडून त्याला बायडिंग करून रफ वही म्हणून गणितासाठी वापरायला सांगतो."- नंदा पेठकर, मुख्याध्यापिका

"मुलांना प्रत्येक गोष्ट नवीन हवी असते, पण जुन्या पुस्तकातून अभ्यास करता येतो आणि मुलांमध्ये देण्याची वृत्ती निर्माण होऊन आपुलकीची भावना निर्माण होते. मूल अभ्यासासंदर्भात एकमेकांशी चर्चा करतात आणि पालकांना आर्थिक हातभार लागला."

-स्वाती सिंग, अध्यक्ष, पालक शिक्षक संघ

text book exchange drive
Nashik: कैद्यांना स्मार्टफोनद्वारे साधता येणार नातलगांशी संवाद! जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्या. मोरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com